वाहतूक शाखा हि त्या त्या शहर पोलिसांची नाक असते असे म्हणतात .वाहतूक शाखा त्या शहर व जिल्हा पोलिसांचे प्रतिनीधित्व करते .कारण वाहतूक पोलीस हे दररोज हे रस्त्यावरील सिग्नलला असतात .खाकीतले पोलीस हे फक्त काही बंदोबस्त ,काही अपघात व काही अघटित घडले तरच रस्त्यावर असतात . परंतु वाहतूक पोलिसाना वाहतुकीचं नियंत्रण करावे लागत असल्याने ते रोज रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करीत असतात .त्यामुळे त्यांचा वाहन चालकांशी म्हणजेच जनतेशी सतत संबंध येत असतो .
वाहतूक शाखेचे सर्वात प्रथम काम म्हणजे शहरातील वाहतुकीचे नियंत्रण करणे .वाहतुकीला शिस्त आणणे .वेळ पडल्यास त्याकरिता वाहतुकीच्या कायद्याची अंमलबाजवणी करणे असे आहे .वाहतूक शिस्तीचे प्रयत्न करताना वाहतूक शाखा नवे नवे प्रयोग करते .वाहतूक जनजागृती सप्ताह ,शाळा, कॉलेज आणि auodhoygik क्षेत्रामध्ये वाहतूक शिस्त आणि वाहतुकीचे नियमाविषयी सेमिनार भरवते ,त्यामध्ये वाहतुकीचे नियम , वाहन चालवण्याच्या परवान्यापासून ते रस्त्यावरील अपघात कसे होतात .ते कसे कमी करता येतील याबाबत खबरदारी कशी घ्यावी याची माहिती देते . शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीची शिस्त व तिचे नियमांचे पालन करण्याची सवय लागावी हा त्यामागे उद्धेश आहे .
हे सर्व लिहिण्याचा प्रयास याचेसाठी केला आहे की लोक म्हणतात पोलीस पैसे खातात .अरे तुम्ही देऊ नका ना ! तुमच्या अडजस्टमेन्टसाठी तुम्ही देता .तुमच्याकडून वाहन चालवताना चूक झाली असेंल तेंव्हा जो काही दंड असेंल तो भरून मोकळे व्हा .झालेली चूक सुधारायला तयार रहा. पोलिसाचा पैसे खाणाऱ्यांमध्ये म्हणजेच लाच घेणाऱ्यांमध्ये २७ वा क्रमांक आहे .इतर खात्यामधील कर्मचारी पैसे घेतो .कारण तो एकदाच पैसे घेतो आणि लाखाचे दस्तऐवज बनवून देतो . प्रत्येक सिग्नलला वेगळा पोलीस असतो . एका पोलिसाने पकडले तर त्याला चिरीमिरी देऊन वाहनचालक सुटतो . पण त्याच्या नशिबाने पुढच्या सिग्नलला पोलिसाकडून पकडला गेला की सर्व कारणे आठवतात .दवाखान्यात जात आहे .आई आजारी आहे .वडील आजारी आहे .इमर्जन्सी आहे .अशी नाना करणे आठवतात .त्यामुळे खरे कारण असले तरी पोलीस त्याच्यावर विश्वास करीत नाही .यासाठीच लोकांना पोलिसाचा राग येतो . तर अशीही काही व्यक्ती महात्मे आहेत ते पैसे न खाणाऱ्ऱ्या पोलिसानां बावळट समजतात .म्हणजे बोलणाऱ्याचे तोंड बंद करता येत नाही .
त्याचप्रमाणे गडगंज श्रीमंत ,श्रीमंत ,नवश्रीमंत ,नेते , यांना कोणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अडवले तर त्यांचा पारा वर चढतो .असे काय घडलेले असते ? त्यांचा मोठा अपमान झाला आहे .मग त्या पोलिसाला बरे वाईट बोलून त्याची त्याच्या वरिष्ठाकडे तक्रार करून मोकळे होतात .म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्याने वा कर्मचाऱ्याने त्यांना अडवून मोठा गुन्हाच केला आहे .त्यांनी त्या नेत्याचे पाय पडले पाहिजे .माफी मागितली पाहिजे तीही भर रस्त्यात . तेही सर्व जनतेसमोर असा त्यांचा अट्टाहास असतो .पण हे का ? देशात कायदे कोण करतो ? विधी मंडळे आणि संसदीय मंडळे हि कायदे करतात .हि मंडळे कशी तयार होतात ? जनता निवडून देते ती हीच मंडळी .या कायदे मंडळात. विधी आणि संसदीय मंडळात हीच आपली नेते मंडळी असतात . हेच कायदे करतात .कायदे सर्वांसाठी असतात .आणि कायदयांसमोर सर्व समान असतात .तेंव्हा नेत्यांनासुद्धा कायदा समान आहेत .कायदा संमत करताना या सर्वाना त्यात सूट दिली आल्याचे कोठेही नमूद नाही .पोलीस हे याच कायद्द्याची अंमलबजावणी करायला असतात.शांतता सुव्यवस्था राखणे हे पोलिसाचे कर्तव्यच आहे .कायद्याची अंमलबजावणी करताना नेत्यांना , गडगंज श्रीमंत,नवश्रीमंत यांना सोडायचे का ?मग कायद्याची अंमलबजावणी कोठे करायची ?सामान्य जनतेवर करायची का ? जिची अवस्था शेळीसारखी आहे .कोणीपण येऊन टिकली मारून जावे .उलट नेत्यांनी एकादी चूक झाल्यास स्वतःहून दंड भरण्यास पुढे आले पाहिजे .आणि जनतेपुढे आपला आदर्श ठेवला पाहिजे .मी नियम पाळतो सर्वानी नियम पाळले पाहिजे .
डेक्कन जिमखान्यावर असेच एका नेत्याला त्याच्या चुकीस एका पोलीस अधिकाऱ्याने कारवाईकरिता अडवले . तो वाहतूक शाखेच्या प्रमुख अधिकाऱ्याचा मित्र निघाला .तो त्यांच्या कार्यालयात गेला आणि त्या पोलीस अधिकाऱ्याची तक्रार केली .वाहतूक प्रमुख मुरलेले होते .त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला चेम्बरमध्ये बोलावून घेतले .नेत्यांवरील कारवाईचा आढावा घेतला .आणि स्वतःच्या खिशातून दंडाची रक्कम भरली .आणि रीतसर पावती घेतली .त्यांच्या असे करण्यामुळे त्या नेत्याचा चेहरा इतका पडला की पाहण्यासारखा झाला .साहेबानी एका दगडात दोन पक्षी मारले .आपल्या अधिकाऱ्यालाही चांगल्या कामाची पावती दिली .आणि नेत्याला दाखवून दिले की कायदयासमोर सर्व समान आहेत .जरी तो माझा मित्र असला तरी .
लोकांना पोलिसाची टिंगल करावीशी वाटते . सिग्नल जम्पिंग ,रॅश ड्रायव्हिंग , डॉस करणे ,गुन्हा करूनसुद्धा पोलिसाना उलट उत्तरे देणे .वाहतूक पोलीस सकाळी घर सोडतो ते रात्रीच ड्युटी संपवून घरी जातो .दिवसभर ड्युटी करून त्याचा चेहरा काळा पडलेला असतो .संध्याकाळी त्याचे कुटुंब ,त्याची मुले ,आपलाच पती आहे का? आपलेच वडील आहेत का? याचा विचार करतात .एक दिवस त्या वाहतूक पोलिसाचा गणवेश घाला आणि रस्त्यात सिग्नलला उभे राहून ड्युटी करून दाखवा .
भर उन्हात आणि प्रदूषणाने कसा त्रास होतो याचा अनुभव घ्या आणि मगच पोलिसाची टिंगल करा .विचार करा दिवाळी ,गणपती आणि सणासुदीचे दिवस ,या दिवशी तो भर रस्त्यावर सकाळ पासून तर रात्री ११.००वाजे पर्यंत म्हणजे गर्दी संपेपर्यंत कर्तव्य बजावत असतो .त्याला सणवार नसतात का? त्याला कुटुंब ,मुलेबाळे नसतात का ? त्याला काही आशा ,आकांक्षा नाहीत का ? आपल्याला सणवार साजरे करता यावे म्हणून तो रस्त्यावर राब राब राबत असतो .आपण त्याची टिंगल करतो .आपल्या नोकरीवर जाण्यास आपल्याला काही अडथळा होऊ नये याची तो वाहतूक नियंत्रण करून काळजी घेत असतो . कोणाचा अपघात होऊ नये प्रत्येक जण सुखरूप आपापल्या घरी पोहचावा म्हणून त्याचा प्रयत्न असतो .रस्त्यात काही झाले तर सर्वात प्रथम वाहतूक पोलिसच मदतीला येत असतो .अपघात असो ,वाहन चालक आजारी पडला अथवा काही विपरीत घडले तर वाहतूक पोलिसच मदतीला धावून येतो .
रिक्षा चालक प्रवाशांना भाडे नाकारतात .वाहतूक शाखेत पूर्वी रिक्षा पथक असायचे .प्रवाशांना कोणी रिक्षाचालकाने भाडे नाकारले तर प्रवाशाने एका पोस्टकार्डवर भाडे नाकारल्याचा दिनांक ,वेळ , ठिकाण आणि रिक्षाचा आरटीओ नोंदणीचा क्रमांक वाहतूक शाखेकडे पाठविला तर हे रिक्षा पथक त्या रिक्षाला पकडून आणून तिचेवर भाडे नाकारल्याची कारवाई करीत असे . त्यामुळे रिक्षाचालकांवर चांगला वचक होता .भाडे नाकारायला रिक्षाचालक घाबरत होते .कारण आरटीओकडे तक्रार केली तर रिक्षावाला जेंव्हा रिक्षावाला रिक्षा पासिंग करायला जाईल तेंव्हाच त्याचेवर आरटीओ कारवाई करणार . परंतु पोलिसाकडे तक्रार केली तर तातडीने कारवाई होते आणि रिक्षासुद्धा आरटीओकडे जमा केली जाते .
२५ वर्षांपूर्वी वाहतूक शाखेत एक पोलीस निरीक्षक प्रशासन आणि एक पोलीस निरीक्षक नियोजन विभागात कार्यरत होते. तर एक सहा .पोलीस आयुक्त आणि एक पोलीस उप आयुक्त होते .आता पोलीस स्टेशनसारखे प्रत्येक वाहतूक विभागाला पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत .म्हणजे २५ वर्षपूर्वी एक पोलीस निरीक्षक सर्व पुणे शहराची वाहतूक व्यवस्था नियंत्रण करीत होते. तेंव्हा आता पुणे शहराची वाहतूक किती वाढली आहे याची कल्पना येते .प्रत्येक महिन्याला ४० ते ५० हजार वाहनांची नोंदणी आरटीओ मध्ये होते आहे .पुण्याची लोकसंख्या जितकी आहे त्याची ५० टक्के वाहने रस्त्यावर आहेत .पुढे येणाऱ्या काळात जितकी लोकसंख्या तितकी वाहने असे चित्र असेल .पुणे शहर हे चहुबाजूनी वाढले आहे .भविष्यातही वाढणार आहे .
रोजची वाहतूक नियंत्रणाची नोकरी करून कोणी व्हीआयपी पुण्यात आले ,मोर्चे निघाले ,मिरवणुका निघाल्या ,नवरात्र, गणपती बसण्यापासून ते विसर्जनापर्यंत अशा व इतर प्रसंगी या वाहतूक शाखेवर किती ताण पडतो याची नुसती कल्पना करून बघा .याबाबतीत वाहतूक पोलिसाचे किती जिकरीचे आणि कौतुकास्पद काम आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे .
शेख मुबारक
९०४९९८७४२५

























